Followers

Sunday, October 11, 2020

खरी भक्ती कोणती????? ..........ही का भक्ति खरी ? पळते मन बाहेरी


 

ही का भक्ति खरी ? पळते मन बाहेरी

(चाल: जाने कहाँ गयी...)

ही का भक्ति खरी ? पळते मन बाहेरीss ।।धृ0।।

देह देवापुढे, लक्ष जोड्याकडे,

नेत्र   ते   वाकडे । हात  चोरी  करी ! होss0 ।।१।।

कोण देवा बघे ? पाहति साथी - सगे,

धोतरे-साडि घे ? झाली यात्रा   पुरी ! होss0।।२।।

कीर्तनी ना बसे, सदा तमाशी दिसे,

दुःखि पाहता हसे । वृत्ति श्वानापरी ! होss0 ।।३।।

माळा घालि गळा, चंदनाचा टिळा,

सावकारी करे ! दया ना   अंतरी ! ।। होss0 ।।४।।

दारुचा डोज घे, भ्रष्ट मार्गी निघे,

दास तुकड्या म्हणे । कैसा भेटे हरी ? ।।होss0।।५।।

No comments:

Post a Comment